१९९२ मार्च अखेरीतला एक दिवस...
बहुदा पौर्णिमेच्या आस-पासची संध्याकाळ...
एलोरा फेस्टिवल वेरुळ्च्या कैलास मंदिराच्या पायथ्याशी...
एका दिवशी २ कलावंत असे ३ दिवस...
९च्या सुमारास व्यासपीठावर पंडित रविशंकरांच प्रसन्न आगमन...
श्रोते सरसावुन...सतार झंकारते......
कुठले राग-बिग काही आठवत नाही , आठवतो तो फक्त रविशंकरांचा सतार वादनाचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव !
काळोखणारी डोंगरातली रात्र...बोचरं थंड वारं...
रंगमंचाच्या अगदी मागेच वेरुळचं भव्य कैलास मंदिर...
त्यामागे डोंगर...डोंगरामागुन मोतिया चंद्र उगवतोय...
पंडितजींची गोरी...नितळ...तेजस्वी मुद्रा...लोभसं हसू...
सतारीवर बोटं मंत्रवल्यासारखी फिरताहेत...
अंगठीतले हिरे मधुनच उजळताहेत...
सुरेलतेचा व नजरबंदीचा सुरेख खेळ श्रोते अनुभवताहेत......
मैफिल रंगतीय... लेण्यांमधुन सतारीचे सुर फिरताहेत...साथीच्या तबल्याचे बोल घुमताहेत...
पंडितजी स्वतःचं भान हरपून सतार वाजवताहेत....जणु आयुष्यभराची सुरांची कमाई त्या कैलासाच्या चरणी अर्पण करताहेत......
सतारीसह ध्यानस्त झाले आहेत पंडितजी...
स्थळ-काळाचं भान हरवून ते स्वतःच एका अलौकिक, स्वर्गीय अनुभवाला सामोरं जात आहेत.....
श्रोतेवृंद संमोहित झालेला...टाळ्या वाजवायलाही विसरलेला...
पंडितजीतर पार सुरांबरोबरंच कैलासाला गेल्या सारखे...निर्मम...रिक्त....रिक्त......
आणि आज तुम्ही स्वतःच कैलासाला अर्पण झालात पंडितजी !

No comments:
Post a Comment