गणपती उत्सव आणी कोटलाकॊलनी( ७० ते ८२ पर्यंतचे वास्तव्य) आठवणार नाही असा माझा एकही गणपती उत्सव नसतो ! त्यामुळे या दिवसात माझ्या घरात जरी सामसुम असली तरी मी मनाने त्या काळातील गणेश उत्सवातचं असते.....आवर्जून जुन्या तिथल्या मित्र-मैत्रीणींना फोन करते....मुलांना त्या काळातील मजेशीर गोष्टी सांगते....
माझी आई या उत्सवात दरवर्षी सुरेख २-३ नाच बसवायची.....( आम्ही कायम Topचे होतो)
असे नाच बसवणारे ४-५ हौशी ग्रुप कॊलनीत होते....नर्तक..गायक..वादकांची भट्टी जमण्यासाठी म्हणुन कार्यक्रमाच्या ६-७ दिवस आधी पेटीवाल्या देशपांडे काकांकडे सेमी रंगीत-संगीत तालीमी रोज व्हायच्या.....
जेमतेम १०x १२च्या तीन खोल्यांचे क्वार्टर...त्यात २५-३० शाळकरी मुली,१०-१२ मोठी माणसं( काही अतिउत्साही तर काही भांडखोर आया) शिकाउ गायक - वादक इत्यादींचा बेसुरा गोंधळ हे देशपांडेकाका
अगदी आनंदाने सुरात बसवायचे! (तेही नोकरी सांभाळुन )
सर्वार्थाने हौशी कलाकार असलेल्या सर्वांना सांभाळुन घेत, कौतुक करत हे काका आमचा सांस्कृतिक कार्यक्रम एकदम जंगी व रंगतदार करत.....
गेल्या अनेक महिन्यांपासुन मला त्यांची आठवण यायची...गणपती आले की मला त्यांची पेटी आठवुन वाटायचे की हे काका आता कुठे असतील? (नसतील सुध्दा!)
हिला विचार...तिला विचार...ह्याच्या कडुन फोन घे...त्याला विचारुन घर शोध...असं करता करता ह्या वर्षीच्या गणपतीउत्सवात त्यांना शोधायचा-भेटायचा मी चंगच बांधला व तडीस पण नेला !
फोन करुन मावशींना सांगीतले की मी पाध्येकाकुंची मुलगी बोलत आहे आणी मला त्यांना भेटायची इच्छा आहे...जातांना त्यांच्यासाठी फळं घेतली...गेल्यावर वाकून नमस्कार करायचा हे ठरवुन गेले! (माझे आई-वडिल दोघंही आता हयात नाहीत) त्याही उत्साहाने या म्हणाल्या....
घर म्हणजे २ छोट्या खोल्या...अस्ताव्यस्त...अस्वच्छ...डायबेटीसची दुर्गंधी...दोघही थकलेले...
काकातर पलंगावरच...२-३ओपरेशन्स झालेली...काही शुगरमुळे फसलेली...औषधांमूळे सुस्तावलेले शरीर...जडावलेली जीभ...पायतर टंब होऊन काळे-निळे पडलेले....(नमस्कार मनातचं राहिला !)
मावशी बर्याच बर्या...रेटताहेत कसंबसं...मुल-बाळ नाही...भाचे- पुतणे जमेल तसं डोकावुन जातात...३-४ फोन नंतर डोक्टर जाता जाता येउन जातात...टीव्ही मात्र सतत सुरु...तेवढाचं आवाज सोबतीला !
मी आल्याचा त्यांना आनंद वाटला...खरंतर एकदम ४० वर्ष मागे जाउन लिंक लावणं त्यांना अवघड झालं...
कोटला कोलनी...मैदान...पिठाची गिरणी...रेशनचं दुकान...चिंचेचं झाड...गणपती...नाच - गाणी...हे काका...त्या मावशी....अनेक तारा छेडल्या पण सूर काही लागेना....
होक्का...बरं...असं का... म्हणत मावशींनी माझ्यागतीने रिवाईंड व्हायचा प्रयत्न केला, काकांना तर सगळंच कठीण होतं !
वार्धक्य... आजार...पेन्शन..महागाई..औषधं..गॆस..कामवाल्या..खर्च...ह्या हतबल घरात कुठेही आशेचा, चैतन्याचा किरण दिसेना....
तरीपण अजुन व्यवधान राखुन असलेल्या मावशी म्हणाल्या.." अहो..त्या तुमच्या पेटीची आठवण काढून खास आल्या आहेत...जरा दाखवता का पेटी वाजवुन ?" मी राहु द्या म्हटलं.. परत कधी!
मी माझं व्ही. कार्ड गरज लागली तर असु देत म्हणुन दिलं..आमचे व्यवसाय सांगीतले..गॆस ऎजन्सी आहे म्हटल्यावर तर i became a light house for her !
मिस्टरांना घेउन व जेवायलाच यायचा वायदा मावशींना करुन मी उदास होऊन परतले...
नमस्कार न करतांच!
आयुष्यातील सूर हरवलेल्या संध्यापर्वात ह्या पेटीवाल्या देशपांडे काका- काकुंना त्यांच्या घरात गणपतीत फुलणारी सुरमयी फुलबाग कधीतरी आठवत असेल का ?

कोटला कोलनी...मैदान...पिठाची गिरणी...रेशनचं दुकान...चिंचेचं झाड...गणपती...नाच - गाणी नाटक ,सोसायटीचे दुकान , पोस्टाचे stamp , काडेपेट्यांचे छापे , घासलेट , क्रिकेट ,बिल्ले आणि गोट्या , बेसबॉल , पतंग , होळी , साईकल , भवरे , लगोरी , सळई, टोक्का , बुढीके बाल , मुंबईचा सिनेमा ,काचेची जादू , जादुचे खेळ , डोंबारी ,जमुरा, कडाकडी कि मजा बडी , नागाचे खेळ , रहाट पाळणे ,अस्वल आणि माकडांचे खेळ ,तळ्यात मळयात , रामरक्षा, मनाचे श्लोक, पाढे आणि महत्त्वाचे म्हणजे बिना कोचचे निखळ खेळ ( हल्ली खेळ सुद्धा , नाच सुद्धा आनंद हरवून व्यवसाय झाला आहे---थोडी चेष्टा हुरडा सुद्धा हिरण्य झाला आहे ) खर म्हणजे TV नसण्याचे आणि tution नसण्याचे अनंत आनंद .
ReplyDeleteअहाहा अख्खी कालोनी उभी झाली डोळ्या समोर ..........
ReplyDelete