Sunday, 2 December 2012

Blotting paper !

Aurangabad to Pune...शुक्रवार सकाळची ८ची शिवनेरी...expected senior and family co-passengers...
पण नाही ! बरेचसे तरुण व नोकर्या व व्यवसाय करणारे...ड्रायव्हरच्या चुकीमुळे शिवनेरी व एशियाड बस चुकीच्या जागी उभ्या...प्रवासी खोळंबलेले...ड्रायव्हर्सचा पत्ता नाही... आले एकदाचे ! platform assistant बाईंनी डयुटीवरचं दिवसातलं पहिलं सत्कर्म म्हणुन दोन्ही ड्रायव्हर्सना  सकाळी-सकाळी येथेच्छ फटकारलं......

निघालो एकदाचे !
जागा पकडून बरेचजण झोपायच्या तयारीत...माझ्या मागच्या सिटवरील दोघांची मात्र ओळखीची मामुली देवाण-घेवाण होऊन गप्पा सुरू ! माझे कान मागे...एक कानडी( जनरल इन्शुरन्सची नौकरी) दुसरा वैदर्भिय(बॆन्केत) पण सध्या दोघेही औरंगाबादेत! बसता क्षणी soul mate सारखे त्यांचे मैत्र जुळले...
आळशी...सुस्त...रांगडया...व no ethics वाल्या( त्यांच्या मते हं ) मराठवाडीवृत्तीवर दोघांचेही सॊलिड एकमत...
बसल्यापासुन त्यांनी जे काही मराठवाडयाला झोडपायला सुरवात केली म्हणता.....अरे चोरांनो... मनाची नाही तर जनाची तरी भिती बाळगाना...तुमच्या समोरच्याच सिटवर मराठवाडयाचं खणखणीत नाणं बसलेलं आहे !
निदान महापालिकेची हद्द तरी संपू द्याना ! ( एक शिवी मनातल्या मनात )

हळु हळु सगळी गाडी गपगार...आसपास पाहिलं...नोकरी, धंदा करणारे झोपलेले...विद्यार्थी झोप कम गाणी...नवविवाहीत बिलगुन...माझ्या सारखी एकटी बाई थोडसंच अंग चोरुन ...( दिवसाचा प्रवास त्यामुळे!)

नगरच्या आसपास ९.३० पासुन जो-तो जागा होऊन मोबाईलवरून कामाला लागलेला...

" अरे... डेक्कन १ बजे पहुंचुंगा, पिक-अप करना"
"madam.. rtgs का क्या हो गया?"
"देखो पुनीत..आज friday है..मै चेक डाल रहा हुं...संभालनेकीभी हद होती है यार...तुम्हारे बहाने monday से सुन रहा हुं"
"hiii..priyaa..जरा accountsमे देना please "
"good morning sir...हां सर..मैने औरंगाबादमे pitch in किया है..next month they will give us purchase order..sir जरा सोलापुरको भी एक फोन करना..please sir...उतनाही मेरा ये महिनेका target हो जायेगा...हां सर..yes sir..
ok sir..thank you sir"
अरे..यार..कहां तुम वो त्रिपाठीके साथ dinner का लोचा रखते हो...lunch fix करो...you know how he drinks"
"life of pi...अरे नाही रे..मी आजचं परत जातोय..उद्या आमची anniversary आहे...thank you!"
" बस मार्च तक कैसे तो भी निभाना है...then i am asking for the transfer"
"क्या birthday treat चाहिये? नितु...पहले मेरा payment निकालो...फिर treat-beatकी बात करो...तुम लडकीयोंकोना...ठीक है..कल देखते है...जरा वो payment..."

माझ्या बहिणीकडे लग्न आहे त्यामुळे फोनवर...पत्रिका...साडया...नथी..तोडे...आमचा हुरडा...i added my own spices !बसल्या बसल्या आपापल्या कामांना गती देउन सगळे जरा निश्चिंत झाले......
जसं-जसं पुणं जवळ येउ लागले तश्या- तश्या aggressive instructions फोनवरुन परत दिल्या जाऊ लागल्या.....

मागची जोडी आता जामचं रंगलेली...चतुरस्त्र विषयांवर त्यांची मतं एक होत होती...how we( indians) always wins the battle..but looses the negotiations ह्यावर त्यांनी बराच इंग्लिश- मराठीत ऊहा-पोह केला...उतरतांना एकमेकांच्या फोनची देवाण घेवाण केली...शेजारी बसुन खूप आनंद झाल्याचे सांगीतले...thank you...thank u..
माझं सुध्दा त्यांना मनातल्या मनात thank you !( शिवी... ते... thank you...nice journy, isnt it ? )

लोकं एकटयाच्या/ एकटीच्या प्रवासाला का कंटाळतात कळत नाही...its so interesting if you act like a blotting paper!
उतरतांना मनात आले आता परतीच्या प्रवासात दोन बायका जरुर माझ्या मागे- पुढे बसाव्यात...just to make it a complete circle !

No comments:

Post a Comment