Sunday, 23 February 2020

असेच मागचे दोन-तीन दिवस...

असेच मागचे दोन-तीन दिवस.

मला कुस्क-यासाठी मदत म्हणून कांदा चिरताना लेटिशियाच्या डोळ्याला धारा लागल्याहेत. I don't know what's wrong with these onoions, whenever I cut them my tears roll down.
...Oh, actually these onions are not so strong, I hardly cry when I cut them, but may be you not used to this kind of Indian amonia. Leave it I will do it.
No, it's ok.
You know Aai, to become adventures, to see-understand adventures side of life I had to come to India.
...Means ?
One of my uncle is like kanhay(माझा बाईकर मुलगा)always going for adventures. My aunty is not like that. She will always travel by plane, and my uncle will join her by traveling on his bike. 
When I was in Brazil I never gave a second thought to his adventures. But now I have messaged him that once I am back, I would like to travel with you. 
If I was not here on exchange program, I would not have understood this.

कुस्करा झक्कास झाला. 
One of my favourite Indian dish म्हणत लट्टूबाईंनी मिटक्या मारत खाल्ला. 

दुपारीच स्कुटर काढून गावात चिक्कार भटकलो.

नुकतीच शिवजयंती झाली होती शुक्रवारचा मुहुर्त गाठून शिवरात्र आली होती आणि आम्ही नेमक्या बाहेर पडलो.
भरपूर फुटकळ कामं केली. मुख्य म्हणजे लेटिशियाला लाखेच्या बांगड्या हाताने बनवणा-यांकडे नेलं. 
दुकानं म्हणजे काय तर दोन दुकानांच्या चिमटीतली चिंचोळी जागा. तिथल्या तिथेच छोटंसं काऊंटर, पाठ-पुढच्या भिंती चमचमत्या रंगबिरंगी बांगड्यांनी-चुड्याने झळाळलेल्या. बाजूच्याच कोपऱ्यात घरातला बुजुर्ग व त्याच्या नजरेखाली ट्रेन होणारी तरुण मुलं, मुली-सुना ठाकठूक करत त्या लाखेच्या बांगड्या करत बसलेल्या. हाताने बनवलेल्या लाख-खड्यांच्या सुरेख बांगड्या. हस्त कारागिरी असूनही अगदी वाजवी किंमतीत. गेल्यासरशी लेटिशियाने आई-मावश्यांसाठी खरेदी केली. तिथून परत तश्याच भाऊबंदकीतल्या लाखेच्या बांगड्यांच्या दुकानात. इथेही घुंगट घेऊन एक शालीन महिला तापलेल्या लोखंडी डिस्कवर बांगड्या करत बसलेली. हे ही घर अत्यंत चिंचोळं. निखा-यांमुळे ती कोंदट खोली गरम झालेली. रोजच्या सवयीमुळे घरातले तापलेल्या डिस्कचा, उष्णतेचा बाऊ न करता वावरत होते. इथेही थोडीफार खरेदी केली. ही मंडळी लाखेचे कानातले व पेंडंटस् पण बनवतात. पण अशा वस्तूंना उठाव नसल्यामुळे सध्या माल नव्हता. बांगड्यांची मात्र रेलचेल. धर्माने मुसलमान पण मुळचे राजस्थानचे असलेली ही दोन्ही कुटुंबे मोठ्या टुकीने व हिमतीने हा व्यवसाय चालवत आहेत. मस्तपैकी ऐसपैस बैठक मारुन आम्ही माल बघत नाही तो शेजारची हिंदू पण मुळची राजस्थानची असलेली सख्खी शेजारीण गप्पा ठोकायला येऊन बसली. मारवाडीणच ती. ऐसपैस देह, घागरा-चोळी, डोक्यावरुन चटकदार ओढणी, राजस्थानी जडावू दागिने, मेंदीभरे हात, तळपाय..लेटिशियाबरोबर मलाही फॉरिनर समजून अतीव कौतुकाने बोलणं. त्या एवढुश्या टिचभर खोलीत झकासच रंगबिरंगी मैफिल जमली. मी खूश, लेटिशिया तर भलतीच कृतकृत्य झालेली. तिच्या रुपाबरोबर, तिचं मराठी ऐकून शेजारीण तर भलतीच खूश झाली. लगोलग स्वत:च्या हातातली खोटी पण जडावाची सुंदर अंगठी तिला भेट म्हणून देऊन टाकली. त्याआधी आम्ही दोघींनीही त्या मुस्लिम-हिंदू मैत्रिणींच्या अंगठ्या बोटात घालून पाहिल्या होत्या. लेटिशियाच्या नाजूक, गो-या बोटावर अत्यंत शोभून दिसणारी ती सोनेरी व विविधरंगी खड्यांनी जडावलेली स्वत:ची अंगठी पाहूनच मारवाडीण फिदा झाली होती. छान गप्पा मारल्या. पुन्हा कधी माझ्याहीसाठी असे खोटे पण रेखीव जडावाचे दागिने अंतर्गत राजस्थानातून आणायचा वायदा घेत करत उठलो.
संध्याकाळ झालेली. भरवस्तीतला बाजार माणसांनी-दुकानांनी सजलेला. 
अशा भरभराटलेल्या, चैतन्यदायी बाजारातून फिरताना नजर निवते. निराशेचा, दु:खाचा लवलेश नसलेले हे बाजार फार थेरपेटीक असतात. 

उतल्या-मातल्या शिवजयंतीचा फडफडणारा भगवा, शुक्रवारचा कर्कश्य अजानी हिरवा आणि लागून आलेल्या सुट्ट्यांचा फायदा उठवणारी रंगबिरंगी आणि बुरखेधारी कौटुंबिक गर्दी, खडकी-औरंगाबादचे चढ उताराचे रस्ते, एखाद्या तृप्त नदीसारखे पण खळखळ वाहते रस्ते-गल्ल्या, दुतर्फाच्या झगमगत्या इमारती-दुकानं आणि आश्वस्त व सुखासीन उद्यासाठी निश्चिंतपणे खरेदी करणारी मानवजात. 
Oh ! What a delightful and positive scene that was.
कशाला लागताहेत ती अवाढव्य शहरं आणि तिथल्या आधुनिक बाजारपेठा ? तळहातावर घेण्याजोगं आपलंच गावं किती चित्तवेधक आहे की. कितीतरी वेळ ते झगमगते, वाहते रस्ते मनात गुंजत राहिले.

तसेच लगोलग ऊसाचा रस प्यायला थांबलो. दोन-तीन वर्षांपूर्वी याच रसवंती मालकाने आमच्या इतका गोड ऊस अख्ख्या औरंगाबादेत नसतो म्हटल्यावर अस्मिदिक या रसवंतीचे पर्मनंट गि-हाईक झालेलं.
You know Aai, we get this sugarcane juice in Brazil also. My family likes it, but I never used to like it there. But now in India I have started relishing it. It's so fresh and authentic. Just love this. Once again I have to have this exchange life to experience this change in me.

परतताना या सुज्ञ युवकांना मिळणाऱ्या एक्स्चेंजच्या अनुभवाचे कितीतरी पदर मनातल्या मनात उलगडत राहिले.

No comments:

Post a Comment