हल्ली या दोन्ही परदेशी पोरींना हिंदी सिनेमे सब टायटल्ससह बघायचा छंद लागलाय.
लेटिशिया माझ्याकडे रहाते तर मेलिन शहरातल्या मध्यभागात रहाते. लेटिशिया माझ्याबरोबर योगाक्लासला येते. नऊला परतलो की झटपट तयार होऊन या दोघीही कन्या एका हॉस्पिटलमध्ये सेवाव्रती म्हणून काम करतात. मेलिन तिच्या घरुन त्या हॉस्पिटलमध्ये येते तर लेटिशिया माझ्याकडून जाते. हॉस्पिटल तसं रोजच जाऊन-येऊन चालत जायला दूर पडतं. तरी या मुली जमेल तसं म्हणजे खिशात पैसे असले तर रिक्षाने जातात नसता लेफ्ट राईट करत जा ये करतात. हॉस्पिटलमधून दुपारी परतल्या की आमच्या घराजवळच त्यांचा कथ्थकचा डान्स क्लास असतो त्यामुळे मेलिन हॉस्पिटलमधून माझ्या कडेच येते. दोघीही जेवतात, सिनेमा बघतात आणि संध्याकाळचा डान्स क्लास करुन आपापल्या घरी जातात-येतात. साहजिकच जेवताना, दुपारी अशा आमच्या खूप गप्पा होतात. यांच्या मनात मला डोकावता येतं. ब्राझिल व फ्रांसमधलं यांचं आयुष्य, भारतातले अनुभव, त्याचं त्यांनी केलेलं इंटरप्रिटेशन जाणून घेता येतं.
All in all its very enriching sharing.
तर काल मुन्नाभाई एमबीबीएस पाहिला. आज रॉक ऑन लावून बसल्या होत्या. मी वरुन खाली आले तर मांजरीसारखं मुटकुळं करुन दोघींच सिनेमा बघणं चाललं होतं.
मग मीही सामिल झाले. या दोन्ही परदेशी कन्यांना अगदीच भावेल असा हा सिनेमा. तुफान गर्क होऊन सिनेमा बघणं चालू होतं. मधेच चित्रपटात I will survive हे गाणं सुरु झालं आणि या दोघींमध्ये एकदम तरतरीच आली. I will survive हे गाणं दोघींनाही छानपैकी माहित होतं. त्यामुळे सिनेमा बघत दोघींनीही या गाण्यावर छान पैकी ताल धरला.
जत्रेसारख्या ठिकाणी हरवल्यावर अचानक कुणी तरी ओळखीचं भेटावं असा निर्मळ आनंद त्यांच्या देहबोलीतून जाणवत होता.
दोघीही छान मैत्रिणी आहेत तरी फुटबॉल वरुन तुम्ही - आम्ही मजेत चालू असतं.
...Both of you know this song ?
Meline...yess, when we won the Football world cup against Brazil, everybody in France was singing this song. कोपरखळी कम् इशारा ब्राझिलियन लेटिशियाकडे होता.
...Oho, when was this ?
It was in 1998. Of course I was not born at that time.
...Then how do you know this ?
My parents told me. My father knows this song by heart.
Ok, that's great.
लेटिशियाला देखील I will survive हे गाणं चालीसह माहित होतं.
हे गाणं माहित नसलेली मीच होते. ग्लोरिया गायनर या महिला गायिकेच हे १९७८ सालचं गाणं. अजूनही जगाच्या कानाकोपऱ्यातल्या हल्लीच्या तरुणांना भावतय यातचं सगळं आलं.
आमचं म्हणजे मी लेटिशिया, असली तर मेलिनच रात्रीचं जेवण म्हणजे भरपूर गप्पा. त्यांची (ब्राझिलियन, फ्रेंच), आपली विचारसरणी, राहणीमान, समाज रचना, सरकार, स्त्री पुरुष समानता, हक्क, त्यातले खाचखळगे, इव्ह टिझिंग, सेक्स्चुअल अब्युझिंग, कायदे, शिक्षा, देशप्रेम, व्हेज-नॉनव्हेज खाणं, शिक्षण, परधर्म प्रेम-द्वेष अशा वैविध्यपूर्ण विषयांवर चर्चा होते. गेलाबाजार भारतातल्या एक्स्चेंजवरही भरपूर उहापोह होत असतो.
सगळ्या अंगांनी वैविध्यपूर्ण व पुर्णतः वेगळ्या असलेल्या संस्कृतीला जाणण्यासाठीच ही जेमतेम १६-१७ वर्षांची मुलं अट्टाहासाने विचारपुर्वक भारत हा देश एक्स्चेंजसाठी निवडतात. इथे यायच्या आधी एक वेगळी संस्कृती अनुभवायला मिळेल म्हणून खूपच अधीर असतात. पण भारतात आल्यानंतरचे स्वागताचे दोन-चार दिवस संपले की मायदेशीची आठवण फार प्रकर्षाने यायला लागते. आपले कुटुंबिय आठवून वारंवार डोळे भरुन येतात.
24*7चा एक नविनच जीवन संघर्ष सुरु होतो.
घरा दारातल्या भाषा, जेवणं, वेळापत्रकं, राहणीमान, आचारांच्या पध्दतीपासून ते रस्त्यांवरचा कोलाहल, अस्ताव्यस्त वाहतूक व्यवस्था, परकीयपणाचे, गोरेपणाचे धोके अशा अनेक गोष्टींशी एॅडजस्ट होताना ही मुलं अक्षरशः घायकुतीला येतात.
हीच का आपली ड्रीम लॅन्ड आणि हाच का आपला जगावेगळा एक्स्चेंजचा प्रोग्राम ? असं वेळोवेळी स्वत:लाच विचारत कसनुसे होतात. क्षणा क्षणाला घरची, कुटुंबियांची, मित्रमंडळींची आठवण येऊन घशात हुंदके दाटतात.
बरं कुठे पटकन बोलायचीही सोय नसते. थोडीशी लाजही वाटत असते. घशातले आवंढे गिळत, स्वत:ची समजूत घालत ही मुलं भारतीय घरात, समाजात फार ब्रेव्ह फ्रंट ठेवतात.
खाजगीत लगेचच परतायचीही भाषा करतात.
मग स्वत:च स्वत:ला बजावून सांगतात की,
NO ! I am not going to give up. I will learn,
I will adjust, but I will complete my program.
It was my dream so I will survive any inconvenience. I will make the best out of it now असा निश्चय देखील करतात.
अर्थात हे सगळं मनमोकळेपणाने सांगायला, स्वत:चं एॅनॅलिसीस करायला नविन वर्ष म्हणजे जानेवारी उजाडायला लागतो. दिवाळीनंतर ही मुलं आपल्या देशात म्हणजे भारतात ख-या अर्थाने मुळ धरायला लागतात.
They feel extremely happy that they could overcome all the atmospheric and emotional ups and downs. They become too confidant about their new found power of surving any condition.
त्यामुळे आजच्या रॉक ऑन या हिंदी चित्रपटातील I will survive या इंग्लिश गाण्यावर त्यांनी उस्फुर्तपणे धरलेला ठेका म्हणजे स्वानुभवातून बदललेल्या त्यांच्या मानसिकतेचचं प्रतिबिंब त्यांच्या देहबोलीतून जाणवत होतं.
No comments:
Post a Comment