रात्रीचं जेवण. दोघच आहोत. सुटसुटीत एकत्र पिठलं-भात केला. खरोखर भात सुरेखच झाला. हळदी-मीठापासून सगळच तब्येतीत पडलं. पावसाळी हवा, गरम भात त्यावर साजूक तूप.. अहा..हा. झकास बेत जमला.
ए...भात मस्त झालाय नं ?☺️
......……………🤔
कायरे..तू सांगितलं नाहीस भात कसा झालाय ते ?😕
आता एवढं न बोलता गपा गप खातोय ना ! त्याच्यातच समजून घ्यायचं.
थांब आता काढतेच फोटो या भाताचा आणि टाकतेच फेसबुकवर. तुला माहितीये हल्ली मला लोकं सुगरण समजायला लागलेत. मला तर हसुच येतं.😝
तुमचं काय बुवा, लेखिका काय, चित्रकार काय, पाक कुशल काय...🤗
हो..पण मी त्यांना पाककलेविषयी अंधारात ठेवत नाही.🙄
आता ते मला सुगरण समजतात त्याला मी काय करु ?🙃 दुनिया जैसी पेश आती होता वैसी नही रहती है हे जर कुणाला कळत नसेल तर माझा इलाज नाही.😔
Saturday, 25 August 2018
राखीपौर्णिमाच्या निमित्ताने...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment