पावसाळा दारात अवंगुठलेला.घरी एक इटालियन पाहुणा आलेला.झाडं लावणं या कार्यक्रमाला तशी खिळ बसलेली.मग दोन्ही मुलं त्या पाहुण्याला घेऊन,माझी गाडी घेऊन पुणं-मुंबईला गेलेली.सुनित आधीच हिरण्यला रहायला गेलेला.आणि मला तर हिरण्यला अगदी सकाळीच जायचं होतं.जरा पाऊस परतायच्या आधीची लैन्डस्केपींगची काही कामं करुन घ्यायची होती.
कशी येऊचा घोळ न वाढवता सरळ काळी-पिवळीने निघाले.शहराच्या काठांवरच्या मेन चौकातून चहूबाजूंच्या फ्रिंज एरियात काळी-पिवळी भरपूर पळतात.पुर्वीही मी २-३वेळेला हिरण्यलाच या ग्रामीण शेयर टैक्सीतून गेलेली आहे.
इथेही एक वेगळच राजकारण सतत धुमसत असतं.हातावर पोट असणारे गाडी ड्रायव्हर,(बरेच पोलिसंच या गाड्यांचे मालक आहेत असं ऐकून आहे)ग्रामीण नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण यांची अगतिग गरज, शहरी लोकांची तटस्थ,वक्रदृष्टी आणि पोलिसांची वरच्यावर कमाई.त्यामुळे नवखं कुणी या गाड्यांच्या स्टॉपवर दिसलं की एकमेकांना भराभर इशारे करत सगळे सावध होतात.
आजही तसचं झालं.एकच गाडी उभी,तिही दुसरीकडे जाणारी.माझे पांढरे केस बघून बरेचदा लोकांना मी चक्क officer in disguise वाटते आणि ते उगा सावध पवित्रा घेतात.लगेच आसपासचे हितमित्र क्युं मैडम,क्या मैडम करत चाचपणी करायला लागले.
जेन्युन प्रवासी आहे म्हटल्यावर निर्धास्त झाले.
मैडम यहां क्यों खडे हो ? वो पैले चौकमें जाना.यहां आने तक तो गाडी फुल्ल हो जाती है..आपको जगह नही मिलेगी.ऑलरेडी असे प्रवास मी केलेले असल्यामुळे जागा नाही हे कारण कुठलाही ड्रायव्हर पुढे करणार नाही याची खात्रीच होती.
त्यात आज श्रावणी सोमवार, रक्षाबंधन.
घ्रष्णेश्वराच्या वाटेवर आजतरी गाडी अडवायची कुणी
माई का लाल हिंमत करणार नाही याची मला खात्री होती.
तसंच झालं.गाडी खच्चून भरुनच आली.ड्रायव्हरच्या दिव्यदृष्टीला माझ्यासाठी जागा दिसली.
बसा म्हटला.बसले.मावले. दारही व्यवस्थित लागलं.
ग्रामीण लोकं काटकुळे असतात याचा हा असा फायदा.
निघालो.थोडं पुढे गेलो परत एक(बहूदा नेहमीचा) शहरी प्रवासी मागे बसवला गेला. मागे सगळ्या ग्रामीण बायका.दोन लहान मुलं.ड्रायव्हरने मधे बसलेल्या बाईंना उतरवून या गुटगुटीत शहरी बाळाला आत ढकललं.सगळ्यांना आपापलं सामान मांडीवर घ्यायला लावलं.मग त्या प्रशस्त बाईंना कोंबलं.सराईतपणे थोडसं मागचं दार उघडं ठेवूनच त्या बाई पण स्थानापन्न झाल्या.लेकरं धरुन आठरा माणसं या गाडीत कटोकट बसवली गेली.मग मात्र गाडी सुसाट निघाली.
करिमुद्दीन नावाचा खुल्ताबादचा ड्रायव्हर.टोपी, दाढी, सुर्मा, खर्जातला, वजनदार आवाज.नेहमीच्या प्रवाशांशी गप्पा सुरु.मधेच त्या स्थुल बाई अडचणीत बसवल्याबद्दल करकर करवादल्या.
शहरी बाळानेही त्वरेने स्मार्ट फोनवर डोकावत शेजा-यांशी फारकत घेतलेली.मी जरा फोटो काढले तर मागच्या बायकांनी पटापट डोईवर पदर घेतले.
फोटो म्हटलं की डोक्यावर पदर-ओढणी त्वरेने घेणं ही इंडियन सब कॉन्टिनेन्टमधल्या तमाम महिलांची खासियत आहे.Unity in diversity.
One gesture and immediately it connects you to the entire sub continent !
Just too amazing !
एक अख्ख कुटुंब रिसोडहून दर्शनाला निघालेले.रिसोड ते जालना बस,तिथून औरंगाबादला रेल्वेने. आता घ्रष्णेश्वरला निघालेले.तिथून पैठणला दर्शनासाठी, मग घरी.दोन लहान मुलं बरोबर.किती लोकांना ओढ-हौस असते दर्शनाची.
माझ्या फोटो काढण्याचं त्यांना कोण कौतुक.
इतके फोटू कशापाई वं ?
हं..मी लिहीणार आहे या बद्दल.
आता बया..लिवायचं काय त्यात ?
परत पदर सावरत खळखळून हसणं.
तुम्ही कुठले,आम्ही कुठले अशा चौकशा करत ह्र्द्य संवाद..दिलको तसल्ली देनेवाला.
स्थुलबाई दौलताबादल्या उतरल्या.धोरणीपणाने गैरसोईची परत आवाजी किरकिर करत ड्रायव्हरच्या हातावर पाच रुपये कमीच ठेवले.त्यानेही समजूतदारपणा दाखवला. मी तर पैसे न विचारताच बसले होते.पण जागरुकपणे इतरांचे व्यवहार टिपले तर नंतर बाचाबाची होत नाही सहसा.
असो.मजा आली आणि येतेच हमखास.
आमच्या हिवाळी हुरडा उत्सवात खुप जणांना यायचं असतं हिरण्यला.महिला मंडळं,भजनी मंडळं,भिशीवाले ग्रुप्स.पण बरेचदा अनेकांची वाहनांची सोय नाही लागत.आम्हीतर आवर्जून सजेस्ट करतो या काळी-पिवळ्या गाड्या.येतात काही मंडळी धमाल करत.
ठरवून-रेखून केलेले असे सार्वजनिक प्रवास खूप काही शिकवून जातात.(न आखता केलेले तर फारंच अनुभव संपन्न होतात)They make you more insightful and wise also.पण त्यासाठी स्वतःला विसरुन जगता आलं पाहिजे.
No comments:
Post a Comment