सकाळी उठले तर माझा मुलगा माझ्या आधी उठुन बाहेर जायच्या तयारीत होता...
मित्राकडे जरा जाऊन येतो म्हणाला, स्कुटर घेऊन सुसाट निघाला....
" अरे...जरा सांभाळुन जा..सकाळी-सकाळी सगळेचजण सैराटा सारख्या गाड्या चालवतात....
आणि परत एकदा गार पाण्याने चेहरा धू म्हणजे झोप पुर्णपणे जाईल" मी माझा काळजीयुक्त monolog ऐकवला.
" हो.... आई.......आता जाऊ का ? "
त्याच्या सकाळ+झोप+सुसाट गाडी या संयुक्त काळजीचं ओझं घेऊनचं मी morning walkला बाहेर पडले.
माझ्या नेहमीच्या रस्त्यावरच्या पहिल्या चौकात नेहमी गर्दी असते...एकतर मोठ्ठ मैदान आहे,
१००-१२५ लोक नेहमीच इथे walk घेत असतात...रस्त्या लगतचं १५-२० भाजी-फळंवाले बसतात...
पौष्टीक व आयुर्वेदीक रस-काढे विकणार्यांच्या पण गाड्या इथे उभ्या असतात....४-५ बेन्चेस पण आहेत...
थोडक्यात walkersची लग-बग इथे निवान्त झालेली असते. त्यामुळे इथुन pass होतांना लोकांच्या चर्चा नेहमी
कानावर पडतात....पाऊस-पाणी, सण-नातलग,महागाई,जमिनी-flatsचे चढते-रास्त भाव,चांगले -वाईट दवाखाने..डॊक्टर्स, pass-port-visa चे झमेले,स्थानीक व राष्ट्रीय राजकारण असं बरचं काहीबाही.
बरेचजण news paper वाचुनचं बाहेर पडतात त्यामुळे ताज्या बातम्यांच्याही खमंग चर्चा इथे होत असतात.
सध्यातर काय मोदी-राहुल या दोन अविवाहीत नेत्यांची चांगलीच जुंपवली आहे ह्या मिडीयावाल्यांनी !
सरदार पटेलांचा अंत्यवीधी..राष्ट्रीय स्मारक...मोदींची तर तोफचं धडधडत आहे....
सुसंस्कृत व मवाळ राहुल स्वतःचा बाज सोडत नाही आहे...
पण एक मात्र खरं जो-तो मोदींच्या पाठीशी आहे !
जादुची कांडी फिरवल्या सारखी झालेली गुजरातची प्रगती व मोदींची खमकी धमक...
everybody is under his spell.
कुटुंबीय व ४-५ खंदे शिलेदार व गांधी आडनावाचा वारसा सोडला तर राहुलच्या पाठी कुणी नाही...
अख्खा पक्ष कुंपणावर....
हे सर्व सर्वपक्षीय राजकारणी या कौरवी रणधुमाळीत राहुलचा अभिमन्युही करायला मागे पुढे बघणार नाहीत.
मन चुकचुकलं....
आईच्या भुमिकेतुन सोनीयाबाईंची काळजी वाटली...
आधीचं आयुष्य उतरणीला लागलेलं...त्यात आजारपण...मोजकीच कुटुंब खर्या विश्वासाची...
कीतीही आपली म्हणली तरी परकीचं अशी रोजची रणनीती व वैर्याच्या रात्री...
वैभवाच्या...सत्तेच्या..राशीत सुध्दा एक आई म्हणुन कुटुंबाच्या काळजीने जीवाची घालमेल नक्कीच होत असणार...
उतारवयात हमखास लागणारी जन्मभुमीची आस ह्या बाईंना लागत नसेल का?
एखाद्या विमनस्क क्षणी ऐ मेरे प्यारे वतन...ऐ मेरे बिछडे चमनच्या अनुभवाला अगदीचं एकाकीपणाने सामोरं जावं लागत असेल नाही?
I think she doesnt have any option but to be on this battle ground !
स्थलांतरीत आई-वडिलांच्या भुमिकांचे संवदनशिलतेने चित्रण करणारा ‘ Namesake' आठवत घरी पोहोचले.

No comments:
Post a Comment