३० नोव्हेंबर २०११ ला आमच्या घरी भरदुपारी ४ लाखाची ( सोनं+ पैसे) दणकून चोरी झाली !
दुपारी घरात शिरतांनाच मला चोरीचा अंदाज आला होता. आत शिरले तर बेडरूम मधील आमचे कपाट चोराने ऊपसून ठेवले होते. कपडे, बॉक्सेस, पाऊचेस, डब्या (दागिन्यांच्या) सगळं उल्टं पाल्टं करून फक्त सोने व रोकड पळवलेली होती. मोती,चांदी, semi precious stones, ईत्यादी कश्यातही चोरांना (बहुधा २-३ असावेत) interest नव्हता. फोन केल्यावर सुनीत(माझा नवरा) व ‘ऑफिस स्टाफ १५-२० मिनिटात आला. ३०-४० मिनिटात पोलीस आले. कुठुन कुठुन आले माहित नाही पण तासाभरात घरासमोर २-४ पोलीस गाडया, ३-४ सिव्हील गाडया, ८-१० पोलीस, आमचा स्टाफ, मित्र असे ३०-३५ माणसं जमली. गर्दी पाहून ‘कॉलनीतील पण माणसं थांबली. चोरीचे नुकसान व धसका राहिला दूर,प्रत्येकाला चोरीचा वृतांत देतांना, ऊचकलेलं कपाट,
ड्रॉवर दाखवतांना दमछाक झाली. तेवढयात एका PSI ने गेलेल्या वस्तुंची यादी करायला सांगीतली. सोने खरेदीची बिलं होती म्हणुन हिशोबाचे काम सोपे झाले. जवळपास १२ तोळे सोने व ३० हजार रुपये गेले.
घरात एवढे सोने होते हे सुनीतला पहिल्यांदाच कळले! मला तर गळ्यातले, कानातले, हातातले असे काही आठवेना.( आणि ह्याच सोन्यासाठी आपण किती जीव टाकतो!)
लगेच dog squad वाले आले.छान कुत्रा, नविन पोलीस पण तीच कहाणी, त्याच खोल्या, कपाटं! Oh god!
हा प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर finger prints वाले आले. परत तीच चोर नारायणाची कथा.
आतातर शेजार पाजारचे, वरच्या ऑफिस मधली माणंस उत्सुकतेने घरभर फिरु लागली. तोडलेली
खिडकी, कपाट, विस्कटलेलं सामान पाहून अनेकजण आपापले चोरांचे अनुभव सांगु लागले. म्हणजे झाले असे की आमची चोरी राहीली दूर, दुसरेच चर्चात्मक कार्यक्रम सुरू झाले, त्याच बरोबर चहापाणी पण! माझी बहिण नीलिमा इथेच होती त्यामुळे चहापाणी अव्याहत बाहेर येत राहिले.
पोलीसांचे तर एकानंतर एक असे चढत्याक्रमाने साहेब लोक येत राहीले. पुन्हा तोच शो तीच कथा.
संध्याकाळी तर आसपासचे लोकं जोडी जोडीने(नवरा बायको) सत्यनारायणाला येतात तसे येउ लागले.चोरांच्या कथानकाला चांगलाच रंग चढु लागला,चहापाणी होवु लागले. ह्या गडबडीत आमचा खरा चोर सुध्दा चहा पिउन जाऊ शकला असता.
चोरीला गेलेल्या दागिन्यांची लिस्ट पोलीसांच्या वेगवेगळ्या डिपार्ट्मेंट्सना हवी होती म्हणलं काढा xerox नी वाटा सगळ्यांना.
घरभर चालुन आणि तेच ते बोलून मी तर पार दमून गेले. पोलीस, स्टाफ, शेजारी, नगरसेवीका,पत्रकार, फोटोग्राफर अशी सगळ्यांची हजेरी झाल्यानंतर खणखणू लागले ते mobiles. प्रत्येकाच्या मोबाईल वरून वाजु लागली तीच रेकोर्ड. एक तर चोरीचा मनस्ताप, नुकसान,त्यात जेवण नाही, फक्त चहा, आणि हा असा गोंधळ. वैतागच आला.
निलीमा जनशताब्दीने जाणार म्हणुन लवकर ऊठले, ती गेल्यावर कंटाळुन ‘हॉल मध्येच झोपले. पेपर मध्ये बातमी वाचुन morning walk ला निघालेले हितचिंतक घरी चौकशीसाठी हजर! मला हॉलमध्ये झोपलेले पाहुन एकजण म्हणाले " झोपु द्या त्यांना, रात्रभर जागरण झालं असेल " सुनीत म्हणाला "हो ना, अहो रात्रभर रडत होती " ( ह्या क्षणी हे लिहीतांनासुध्दा मला हसू येत आहे )
ऊशीरा उठल्यामुळे व कालच्या राडयामुळे मी सकाळी भराभर कामाला लागले.सुनीतला फोन येउ लागले. "अरे... मेधाकडे इतकं सोनं असेल असे आम्हाला वाटले नव्ह्ते....ती तर खादीचे कपडे घालते ना?" सुनीत म्हणाला "अग..... मला देखील सोन्याचं कालच कळलं " ( लिस्ट वाचुन). म्हणजे बघा चोरीमुळे आर्थिक नुकसान तर झालेच,उलट social image का खुर्दा भी हो गया!
माझ्या दोन्ही कामवाल्यांना चोरीबद्दल सांगीतल्यानंतर" ताई कुत्र पाळा", "बाई लॉकर मध्ये दागिने ठेवत चला" असे मौलिक सल्ले देऊन, कामकरुन त्या आपल्या निमुटपणे गेल्या. कन्हायचे मित्र बाहेरच्याबाहेर येउन गेले (नशिबाने)! लग्नाला गेलो तर "या,,, तुमच्याचकडे चोरी झाली ना? आजच्या पेपरमध्ये नाव आहे तुमचे !" अश्या गजरात झाले.OMG! No one was allowing us to get away or forget about it !
गंमत म्हणजे या चोरीमुळे आम्ही काही फार घाबरलो वा हादरलो नाही. होता है।द्र्व्यसंचय व सुवर्णसंचय करू नये असाच धडा या चोरीने आम्हाला शिकवला व थोडंस काळजीपुर्वक राहण्याचा पण.
निलीमा म्हणाली तू रडली कशी नाहीस? मी तर खचुनच गेले असते.All of you are so cool.
रडायचं काय त्यात? एवढी हाय खाण्यासारखं झालय काय? चोरीच ना? अरे... जान है तो जहान है।
दुपार पासुन सुनीतला खूप जणांचे फोन. घरी कधी आहात? भेटायला यायचे आहे.( सांत्वनासाठी).
शेवटी त्याने सांगीतले, सांत्वन करण्यासारखे काही झालेले नाही. We are absolutely fine.
लोकांचे, मित्रांचे चौकश्यांचे फोन,चर्चा,संवाद आम्ही share करतोय व हसतोय. नेहमीप्रमाणे मी खुपच जास्त हसते आहे. निर्मिका म्हणते "mom... you have become crazy!" मी म्हणलं, "हो.... छापा पेपरमधे .... " चोरीमुळे गृहीणीच्या डोक्यावर परिणाम !".
No comments:
Post a Comment