Friday, 11 November 2011

तू मला खूप आवडतोस !


तु मला खुप आवडतोस.... हे वाक्य मी अगदी सहज व उस्फुर्तपणे दोनदा उच्चारले आणि क्षणभर मी स्तब्धच झाले! कीती वर्षांनी मी अश्या अत्यन्त पारदर्शि व नितळपणे भावना व्यक्त केल्या, माझे मलाच आश्चर्य वाटले.

आमच्या घरासमोर बांधकाम सुरू असलेल्या बंगल्यातील वॉचमनचा हा मला आवडलेला मुलगा! वय वर्ष ८-९, नाव " मोझेस ".वर्षभरापासून आमच्यासमोर हे कुटुंब राहते, पण माझी मैत्री मात्र ३-४ महीन्यांपासूनची. आमच्या हिरण्यवरच्या येउन, जाउन असलेल्या pet dogs (elfi, elf,jeeva,gojee) मुळे त्याची व माझी मैत्री झाली व आम्ही कुत्र्यांविषयी गप्पा मारू लागलो.

जेव्हा त्याने त्याचे "मोझेस" हे नाव सांगितले तेव्हा हे नाव मराठी का english हेच मला कळेना, मग लक्षात आले... अरे हा तर मायकलेंजलोचा "मोझेस"! खुपच हसु आले. मायकलेंजलोने शिल्पीत केलेला "मोझेस" खूप रागावलेला असा आहे, आता त्याने ह्या " मोझेस" पाहीले तर तो परत चिडेल का हसेल? ह्या कल्पनेनेच मला हसू आले.
नंतर मी त्याच्या कुटुंबाला उरलं सूरलं अन्न- वस्तु देउ लागले, त्यांच्याशी बोलू लागले. पण मनात बसला तो "मोझेसं "च!
इतक्या सहजपणे तो मी चौकश्या केल्या नंतर त्याच्या नवऱ्याने हाकललेल्या बहिणी, मावसोबाचा दुसरा घरोबा, दारू व इतर गोष्टी सांगायचा की मला वाटायचं अरे खरा मोजेसच भूतलावर आला आहे की काय?
खरे तर ह्या दिवाळीच्या सुट्टीत मी त्याला घरी projecterवर सिनेमा दाखवणार होते पण त्या आधीच तो व त्याचे कुटुंबीय ठेकेदाराच्या सांगण्यावरून घर सोडून गेले. सकाळीच कालची भांडी द्यायला आला, म्हणाला आज आम्ही चाललो. म्हटलं जायच्या आधी परत एकदा ये.
एकदम तयार बियार होऊन अचानक आला, त्याला द्यायाला माझ्याकडे काहीही नव्हते, पैशांशिवाय! व मला ते द्यायचे नव्हते.
मला काय करावं तेच सुचेना.

शेवटी त्याला म्हटले बस सोफ्यावर मी तुझा छान फोटो काढते... आणि तुला माहित आहे का ?की तु मला फार आवडतोस!

"मोझेस" गेला आणि मी माझ्याचं उस्फुर्त प्रतिक्रीये भोवती फीरत राहीले.
खरंच आपण मोठे होतो म्हणजे काय होतो?
आपल्या क्रीया, प्रतिक्रीयांचा पारदर्शिपणा, नितळ्पणा कमी कमी होत जातो,एकप्रकारची तटस्थता येते.विचारातील, कल्पनेतील तरलता
शब्दातुन, कृतीतून प्रकट केली जात नाही. जाणवणार नाहीत अश्या भिंती नातेसंबंधात, माणसामाणसांत उभ्या राहतात व आपण एका निरागस आनंदाला मुकतो.
"मोझेस" नी मला आत्मपरिक्षणाची संधीच दीली.
खरंच खुप लाघवी मुलगा होता तो! त्याला परत बोलावुन प्रोजेक्टरवर सिनेमा नक्की दाखवायचा असं मी आणि निर्मिकाने ठरवले आहे.
आता आधी हा व नंतर मायकलैजलोचा " मोझेस" आठवतील.

1 comment:

  1. You have good diction. This is very good. Keep writing. The artist and writer are constantly making their presence felt in this post. Let us see which one wins. I like Gaja Gamini by M.F. Husain. That movie is like his painting. You can merge the writer and painter in you just like this.

    ReplyDelete